विचारवेध : विचारवेचे

१९९४ पासून २००७ पर्यंत, १४ वर्षे, ‘विचारवेध’ संमेलन आयोजित होत असे. सातारा येथील आंबेडकर अकॅडमी तर्फे किशोर बेडकिहाळ आणि त्यांचे सहकारी निरनिराळ्या गावांत, तेथील कार्यकर्त्यांच्या सहयोगाने, हे संमेलन आयोजित करीत.
समाजाच्या प्रगतीसाठी निर्भीड आणि सखोल विचारमंथन करण्याचा विचारवेध संमेलनांचा ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी विचारवेध संमेलने पुन्हा सुरु होत आहेत.
भारताच्या राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे व मुलभूत अधिकार आणि सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टीकोन, सर्वासमावेषक विकास, समता, मैत्रिभाव यांच्याशी वैचारिक आणि भावनिक निष्ठा असणाऱ्या सर्वांना हे विचारवेध मंच हक्काने उपलब्ध आहे.
वार्षिक संमेलनांच्या बरोबरच विचारवेध ही विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोचणारी सातत्याची चळवळ आहे. लोकांच्या विचारांना अभिव्यक्ती देणारे माध्यम आहे. ‘विचारवेचे’ ही छोटी भाषणे सर्वांना सहज उपलब्ध आहेत.
‘विचारवेचे’ ऐका, इतरांना सांगा आणि चार्चांमध्ये उत्साहाने भाग घ्या.

विचारवेध youtube  विचारवेचे

वार्षिक संमेलनांच्या बरोबरच विचारवेध ही विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणारी एक सातत्याची चळवळ आहे. ‘विचारवेचे’ हा त्याचाच एक महत्वाचा भाग. लोकांच्या विचारांची अभिव्यक्ती व्हावी तसेच सातत्याने नवे, अभ्यासपूर्ण विचार लोकांसमोर यावेत ही यामागची भूमिका. यामधे अनेक विचारवंतांची, अभ्यासकांची आणि कार्यकर्त्यांची छोटी भाषणे रेकॉर्ड करून ती Youtube वर मोफत उपलब्ध करून देणे हे काम विचारवेध सातत्याने करत आहे. अनेक वक्त्यांची विविध सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक विषयांवरील एकूण600हून अधिक छोटी-मोठी भाषणे म्हणजेच ‘विचारवेचे’ आतापर्यंत आमच्या youtube चॅनल वर उपलब्ध आहेत व तसेच साधारण 25000 subscribers चा श्रोतावर्ग या चॅनलला आहे. हे विचारवेचे मुख्यतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील तरुण आणि विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी पाहतात. सर्व विचारवेचे मुख्यतः मराठी भाषेत आहेत पण काही निवडक हिंदी आणि इंग्रजी मधे देखील उपलब्ध आहेत.