चर्चागट

विचारवेध चर्चा गट 

विचारवेध  संमेलनांची चळवळ महाराष्ट्रात 1992 पासून सुरू आहे.  वेगवेगळ्या महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर समाजाचे,  विशेषतः सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे,  प्रबोधन करणे हा विचारवेधचा  हेतू आहे.  भारतीय परंपरेत ‘बाबा वाक्यं प्रमाणम’ याला महत्त्वाचे स्थान आहे,  त्याला छेद देऊन समाजाला वैचारिक घुसळणकीची सवय लावणे आहे विचारवेधचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे.

विचारवेधची कार्यवाही मुख्यतः वार्षिक संमेलने,  युट्युब वर सर्वांना उपलब्ध असलेली सामाजिक विषयांवरची छोटी अभ्यासपूर्ण आणि माहिती देणारी व्याख्याने,  निबंध मंथन आणि चर्चागट या माध्यमातून चालू आहे.

वैचारिक घुसळण आणि कार्यकर्त्यांचे  प्रबोधन यासाठी विचारवेध चर्चागट ही चळवळ सुरू आहे.

 

पुण्यात विचारवेध चर्चागट सुरू आहेत:

दिनांक: 18 डिसेंबर, भगतसिंह हॉल, पुणे

विषय: माझा रशियाचा प्रवास – अण्णाभाऊ साठे

अभिवाचन: हृद्धी म्हात्रे                             उपस्थिती :11

charchgat

दिनांक: साने गुरुजी विद्यालय पुणे

विषय: मध्ययुगीन इतिहाससे जुडे कुछ सवाल

वक्ते: राम पुनियानी                               उपस्थिती: 24

विचारवेध चर्चा गटांचे उद्देश:

 • माहितीपूर्ण वैचारिक व्याख्याने श्रोत्यांपर्यंत पोचवणे
 • श्रोत्यांना स्वतः चिकित्सक विचार करण्याची, वैचारिक  घुसळण करण्याची, सवय लावणे
 • कार्यकर्त्यांमध्ये चळवळीत काम करताना उपयोगी ठरेल असे वैचारिक सामर्थ्य निर्माण करणे

विचारवेध चर्चा गटांची कार्यपद्धती:

 • प्रत्येक चर्चा गटात दहा ते वीस व्यक्ती असाव्यात.
 • कोणीही व्यक्ती चर्चा गटात सहभागी होऊ शकेल पण शक्यतोवर कट्टर इतर धर्म द्वेष्टे (बजरंग दल,  जमात-ए-इस्लामी, इ.) आणि  विषमता समर्थक (राखीव जागा विरोधी ,  ‘स्त्रीचे क्षेत्र चूल आणि मूल  एवढेच आहे’ असे मानणारे) हे त्रासदायक ठरू लागले तर त्यांना सहभागी होऊ देऊ नये.
 • चर्चा गटाने पुढील आठवड्यात कोणत्या विचारवेध यू ट्यूब चॅनेल वरील भाषणावर चर्चा करायची ते आपापसात चर्चा करून ठरवावे.
 • चर्चागट दर आठवड्यातून एकदा ठरलेल्या एका ठिकाणी भेटावा.
 • सुरुवातीला विचारवेध वरील भाषण एलसीडी प्रोजेक्टरच्या साह्याने पडद्यावर,  किंवा लॅपटॉपच्या साह्याने टीव्हीवर किंवा यापैकी काहीच उपलब्ध नसल्यास प्रत्येकाने स्वतःच्या मोबाईलवर ऐकावे, त्यानंतर चर्चा व्हावी.
 • चर्चा गटातील सदस्यांना आवश्यक वाटेल तेव्हा सदस्यांनी   स्वतः एका सामाजिक विषयाचा अभ्यास करून  स्वतःचे विचार मांडावेत.
 • आवश्यक वाटेल तेव्हा सुरुवातीची मांडणी करायला पाहुणा  वक्ता बोलावण्यास हरकत नाही.
 • मुख्य भर हा विचारवेध युट्युब चैनल वरची भाषणे ऐकून त्यावर चर्चा करणे हा असावा. त्यामुळे एकतर, वक्ता ठरवणे,  त्याला बोलावणे,  त्याचा प्रवास खर्च आणि मानधन यावरील श्रम आणि खर्च वाचतो.  दुसरे म्हणजे, भाषण लांबले आणि चर्चेला वेळ मिळाला नाही असे होत नाही.
 • चर्चा अंदाजे एक तास चालावी. चर्चेत सर्व उपस्थितांना भाग घ्यायला पुरेशी संधी असावी पण कुणावरही चर्चेत भाग घेण्याची सक्ती असू नये.
 • उपस्थितांकडून खर्चापोटी   ऐच्छिक मदत गोळा करावी.
 • चर्चा झाल्यावर युट्युब वर ‘कॉमेंट्स’ मध्ये जाऊन प्रत्येक उपस्थिताने आपली कॉमेंट नोंदवावी. ती एक शब्द उदाहरणार्थ ‘उत्तम’,  ‘कंटाळवाणा’ ते एक परिच्छेद असू शकेल.

तुम्ही तुमच्या वस्तीतप्रभागातशहरात असे  विचारवेध चर्चा गट सुरू करून या महत्त्वाच्या आणि  सध्या एकमेव अशा  ‘चिकित्सक वैचारिक घुसळण  संस्कृतीनिर्माण करण्याच्या कार्यक्रमात पुढाकार घ्यावा अशी विनंती आणि आवाहन आहे.

तुमचे साथी विचारवेधी

नाव फोन ईमेल
सरिता आवड 9833987568 sarita.awad1@gmail.com
आनंद करंदीकर 9604518539 anandkarandikar49@gmail.com
अनिकेत साळवे 8796405429 asalve435@gmail.com