सामाजिक जाणीव आणि व्यक्तिमत्व विकास

सामाजिक जाणीव आणि व्यक्तिमत्व विकास

सामाजिक जाणिव आणि व्यक्तिमत्व विकास

पार्श्वभूमी

नोकरीच्या  शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांची संख्या एककोटीहून जास्त आहे आणि ती वाढतेच आहे. छुप्या बेरोजगारांची संख्या तर त्याहूनही जास्त आहे.  हे छुपे बेरोजगार मुख्यतः  सरकारी नोकरीसाठी वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेला बसणारे तरुण आणि दुसरे काही जमत नाही म्हणून अपुऱ्या अनुभवाने आणि भांडवलाने उद्योग सुरू करून बुडीत जाणारे तरुण आहेत. असे तरुण आत्मविश्वास गामावतात आणि त्यांचे  समाजभानही संकुचित होते.

तरुणांमध्ये मध्ये सामाजिक जाणिव वाढवण्याची गरज आहे.  मी समाजाचे काही देणे लागतो आणि त्याची परतफेड मी प्रयत्नपूर्वक  करू शकतो असा आत्मविश्वास  तरुणांमध्ये  निर्माण करण्याची गरज आहे. तरुणांमध्ये सामाजिक जाणिव वाढवणे,  तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवणे आणि तरुणांना सामाजिक दृष्ट्या उपयुक्त काम करण्यासाठी सक्षम बनवणे;  तसे काम करण्याची त्यांच्यात इच्छा निर्माण करणे; यासाठी सध्या कुठलाही अभ्यासक्रम उपलब्ध नाही.या पार्श्वभूमीवर  विचारवेध असोसिएशन तर्फे   सामाजिक जाणिव आणि व्यक्तिमत्व विकास  हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.

 

पाठ्यक्रम उद्देश आणि विषय

तरुणाची प्राथमिक चाचणी घेऊन त्याची बलस्थाने कशात आहेत याचा शोध घेणे तरुणाची इच्छा, कल आणि बलस्थाने लक्षात घेऊन त्याला कुठल्या क्षेत्रात सामाजिक दृष्ट्या उपयोगी काम करणे अधिक शक्य होईल याबद्दल त्याला मार्गदर्शन करणे विविध सामाजिक प्रश्नांबद्दल तरुणाची समज वाढवून ते अधिक प्रगल्भ करणे, उदाहरणार्थ: आर्थिक परिस्थिती,  विषमता,  दारिद्र्य समाजातील दलित जाती आणि गट आणि त्यांचे प्रश्न स्त्री पुरुष समानता आणि पुरुषांच्या विशेष जबाबदाऱ्या

समाजात वावरताना आणि काम करताना लागणाऱ्या किमान गुणांची  निर्मिती आणि वृद्धी,  उदाहरणार्थ: ऐकण्याची कला,  संभाषणाची कला,  आपला मुद्दा पटेल अशा पद्धतीने मांडण्याची हातोटी,  आपण सांगतो त्यात ऐकणार्‍याला त्याचा फायदा वाटेल अशा पद्धतीने कसे सांगावे, आपले म्हणणे थोडक्यात कसे लिहावे,  सामाजिक प्रश्नांची पाहणी कशी करावी,  रोजगाराच्या संधी कशा शोधाव्या,  शोधलेल्या रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी आपण अधिक सक्षम कसे बनावे रोजच्या वागणुकीचे आणि कामाचे  नियोजन.

प्रशिक्षणाच्या पद्धती आणि कालावधी

सुरवातीला प्रत्येक सहभागीची प्राथमिक चाचणी घेऊन त्याची बलस्थाने कशात आहेत याचा शोध घेतला जाईल. विचारवेध तर्फे गेल्या पाच वर्षात  तरुणांमधील सामाजिक जाणीव वाढवण्यासाठी पाचशेहून जास्त व्हिडिओ फिल्म बनवण्यात आल्या  आहेत.  यातील निवडक शंभर व्हिडीओ फिल्म या दृक-श्राव्य माध्यमातून शिकवण्यासाठी वर्गात एलसीडी प्रोजेक्टर द्वारे वापरल्या जातील.

अभ्यासक्रमात सहभागीना  आपापसातील संवाद,  प्रत्येक सहभागीने छोटे भाषण करणे,  विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे याचा सराव तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याची पुरेशी संधी आणि तज्ञांचे पुरेसे वैयक्तिक मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रत्येक तुकडीत फक्त 15 तरुणांना प्रवेश देण्यात येईल..

तरुणांना पाहण्यासाठी जास्तीचे व्हिडिओ आणि वाचण्यासाठी उपयुक्त पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील तरुणांना दोन सामाजिक प्रश्नांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याचा अनुभव मिळेल आठवड्यातून पाच दिवस, रोज दोन तास,  याप्रमाणे प्रशिक्षणाचा एकूण कालावधी बारा आठवड्यांचा म्हणजे 80  दिवसांचा असेल. एकूण प्रशिक्षण काळ हा  160 तास वर्गात  अधिक प्रत्यक्ष सर्वेक्षण 40 तास मिळून 200 तास असेल. अभ्यासक्रमाच्या शेवटी, तरुणाची इच्छा आणि बलस्थाने लक्षात घेऊन त्याला कुठल्या क्षेत्रात काम करणे अधिक शक्य होईल याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.

प्रशिक्षक

आनंद करंदीकर

शिक्षण: B.Tech, M.B.A.(I.I.M. Calcutta), Ph.D.(Pune)

कार्यानुभव: भारतातील सर्वात मोठ्या आणि २९ देशात कारभार असलेल्या व्यवस्थापन सल्लागार METRIC संस्थेचे प्रवर्तक आणि २५ वर्षे अध्यक्ष.

भारतातील 50 हून  जास्त कंपन्यांचे व्यवस्थापन सल्लागार

Distinguished Professor,   INDSEARCH,

पुस्तके :

वैचारिक घुसळण, साधना प्रकाशन

रोजगार निर्मितीची दिशा – रोहन प्रकाशन

माझ्या धडपडीचा कार्यनामा – रोहन प्रकाशन

Stories of Marketing in India – Popular Prhashan

सामाजिक कार्य 

उदगीर यथे युवक क्रांति दलाचे  (युक्रांद)  पूर्णवेळ काम.

स्त्री मुक्ती चळवळ, लोकविज्ञान चळवळ यात सहभाग.

बेरोजगार तरुण आणि जमीन गमावलेले आदिवासी यांच्या बरोबर सत्याग्रहात सहभाग

सरिता आवाड

शिक्षण: B.COM. M.A. Psychiatric Social Work , Tata Institute of social Work, (TISS) Mumbai.

कार्यानुभव:  इंडियन इंस्टीट्यूट ऑफ एज्युकेशन मध्ये शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या प्रकल्पात काम केले.

बँक ऑफ बडोदा मध्ये 25 वर्षे कार्यरत.

पुस्तके : हमरस्ता नाकारताना हे आत्मचरित्र 2019 मध्ये राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.

सामाजिक कार्य 

मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेऊन पुन्हा सामाजिक कामात सहभाग :

स्त्री मुक्ती संघटनेतर्फे कुटुंब सल्ला केंद्रात समुपदेशनाचे काम

स्वाधार – गोरेगाव या मृणाल गोरे यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या कामात सहभाग

मिळून सार्‍याजणी या विद्या बाळ यांनी सुरू केलेल्या मासिकात संपादकीय सहाय्य.

सध्या विचारवेध या चळवळीत पूर्ण वेळ काम

काही अतिथी प्रशिक्षक: प्रशिक्षण कार्यक्रमात  म्हणून पुढील मान्यवर अतिथी प्रशिक्षकांकडून अधिक  ज्ञानसंपन्न होण्याची संधी : डॉ. अंजली आंबेडकर, अॅडव्होकेट अर्चना मोरे,  प्राध्यापक प्रवीण सप्तर्षी,  डॉक्टर मोहन देस, तमन्ना इनामदार, किरण मोघे, श्रीरंजन आवटे, गिताली वि. म., विवेक सावंत

 

रुपये 10,000/- दहा हजार फक्त भरून आजच प्रवेश घ्या. जागा मर्यादित

 

संपर्क :

अनिकेत साळवे 8796405429

सुदर्शन चखाले  7887630615

ऑफिस :

विचारवेध मजला 2, समाजवादी महिला सभा इमारत, मॅजेस्टिक पुस्तकालया शेजारी, शनिवार पेठ , पुणे

वेळ – रोज सायंकाळी 3.00 ते 6.00

brouchure डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

brouchure सामाजिक जाणिव आणि व्यक्तीमत्व ववकास

सामाजिक जाणीव आणि व्यक्तिमत्व विकास