निबंध आमच्या घरातील लोकशाही-पवन देव्हडे

आमच्या घरातील लोकशाही

              लोकशाहीची व्याख्या तशी खूप व्यापक आहे. लोकशाही म्हटले की, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता या गोष्टी आल्याच पण या गोष्टी आज आमच्या घरात-कुटुंबात दिसतात का? आज आमच्या घरात  बाप अन लेकाचं राहिलं नाही नातं अन गावातल्या टपरीवर दोघांचही खातं* या उक्तीप्रमाणे गावा-गावात बाप-लेक एकाच दुकानात उधारी ठेवत असतात. त्यांच्यामधील एकता कुठे हरवली आहे? हा खुप मोठा प्रश्न आहे.

घरात मुलगा वडिलांना बोलत नाही आणि वडिलांचे मुलाकडे लक्ष नसते. वडील फक्त मुलींनाच नियम लावतात तू रात्री घराच्या बाहेर जायचे नाही बरं  संध्याकाळी आठ वाजेच्या आत घरी ये आणि मुलगा बारा-एक पर्यंत घरी येत नाही. मग फक्त त्यालाच का?  घरात मुलींना स्वातंत्र्य का नको त्यांनाच का बंदी, नियम मग लोकशाहीचा काय अर्थ फक्त स्वातंत्र्यता, बंधुता, समता, एकता हे फक्त पुस्तकातच का मग आमच्या घरात महिलांसाठी लोकशाही नाही का? स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष  झाले तरी महिलांवर हा अन्याय का घरात जर मुलगा झाला तर पेढे वाटतात आणि मुलगी झाली तर जेलेबी वाटतात मुलगा झाला तर घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर हसू असते जर मुलगी  झाली तर कशाला झाली काट्टी उगाच झाली नशीबच फुटकं आहे. मुलाप्रमाणे त्या मुलीचा लाड करत नाही. आणि म्हणतात की, मुलगी हे परक्याचे धन आहे.  हा भेदभाव करतात.

            लोकशाहीचे तत्व एकता आणि बंधुता कुठे असते लोकशाहीतील हे तत्व मुलांसाठीच असते का देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले तरी आमच्या घरातील माता भगिनींना स्वातंत्र्य नाही. का कुठे नेवून ठेवले हे लोकशाहीचे तत्व समता, बंधुता, स्वातंत्र्य का फक्त भाषण, व्याख्यानात बोलायचे लोकशाही ही सर्वांसाठी आहे. हे फक्त भाषण व्याख्यानापुरतेच मर्यादित ठेवायचे का देवीची पुजा करायला चालते आणि घरातील मुलगी उशिरा घरी आली की त्यांना नको ते बोलणार उद्या कुठे जायचं नाही असच जर केल तर लग्न लावून देईल.असे बोलले जाते. मग ही बंधने मुलीलाच का मुलाला का नको. बंधन, नियम एकीकडे. मतदान निवडणूक या वेळी म्हणतात की या-या पक्षाच्या चिन्हालाच मत करायच पण इथे मतदान करण्यापुरताच त्यांचा मान सन्मान आहे आणि मतदान करतांना पण  घरातील पुरुष किंवा मुलगा बोलतो की आपल्याला याच नेत्याला निवडून आणायचे तो नेता त्यांना ओळखत सुद्धा नाही.महिलांना पण स्वातंत्र्य असू द्या त्यांच्या मनासारखा नेता निवडून आणण्याचे .पण आमच्या घराघरात हे दिसत नाही.

                आपल्या भारतीय संविधानात लिहून ठेवले की, शिक्षणाचा समान अधिकार आहे. पण महिलांसाठी, मुलींसाठी नाही का? आज आमच्या घरात फक्त मुलींना १० वी किंवा १२ वी झाली की लगेच त्यांचे लग्न लावून दिले जातात. त्यांना उच्च शिक्षण घेण्याचा अधिकार नाही.  जास्तीत-जास्त घरात मुलींची १० वी झाली की लग्न लावतात.त्यांना नीटपणे १२ वी  सुद्धा शिकू देत नाहीत. पुर्वी मुलींच्या लग्नाचे वय १८ होते. आता जर २१ केले तरीही आज आमच्या घराघरात मुलींचे लग्न लावून दिले जातात. मग सरकारने वयात बदल केला तो काहीच फायद्याचा नाही का मग संविधान फक्त शाळांमध्ये म्हणण्यापुरते आहे का? ते संविधानचे तत्व फक्त संविधानातील पानापुरतेच मर्यादित आहे का? हा प्रश्न शिकणाऱ्या  घरातील सर्व सदस्यासाठी आहे. लोकशाही ही फक्त पुरुषसाठीच आहे का तसे बघीतले तर सर्व कायदे महिलांच्या बाजुने आहे. पण  आजच्या काळात आमच्या माता भगिनींना शिकू देत नाही. यामुळेच त्यांना कायदा काय आहे हे माहीत नसते. अनेक व्यक्ती म्हणतात की लोकशाही सर्वांसाठीच असते पण हुंडा देणे आणि घेणे या कारणामुळे देखील मुलींना जन्म घेऊ देत नाहीत. मग तेव्हा आमच्या घरातील लोकशाहीचे तत्व कुठे असते. आणि घराघरात मुलींच्या गर्भातच हत्या केल्या जातात मुलगा हा वंशाचा दिवा मानला जातो. म्हातारपणाचा आधार म्हणतात. पण तो मुलगा खरंच म्हातारपणी जीव लावतो का तर उत्तर येईल नाही. मुलींना माया असते आणि मुलांना माया नसते असे मत ग्रामीण भागातील लोकांचे आहे. त्यामुळेच काही प्रमाणात मुलींना जीव लावतात त्यांचे हट्ट,लाड पुरवतात तेव्हा खरे म्हणता येईल की, लोकशाही आहे किंवा प्रजासत्ताक देश आहे. पण हे चित्र कथा, गोष्टीमध्येच पहायला मिळते. या आमच्या घरा-घरातील हुकुमशाहीमुळे मुलींची गर्भातच हत्या केली जाते तेव्हा ती मुलगी गर्भातून काय सांगत असते ते एका कवितेतून एका कवीने लिहिले आहे. 

               ” नऊ महिने नऊ दिवसानदिवसांनी झाली जग बघण्याची घाई

वंशाच्या दिव्यापाई नको पणती विझवु आई

उद्या तुझ्या गर्भाची गं चाचणी होणार गं

मुलगी आहे म्हणूनी सारे नाक मुडणार गं

ओ माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकु येई

वंशाच्या दिव्यापाई नको पणती विझवु आई ” 

             या कवितेत मुलगी आईला सांगते की मलापण जन्म घेऊ दे मला पण जगण्याचा अधिकार आहे. अशी आशा या कवितेत छोटी मुलगी व्यक्त करते. पण या समाजाचा नकारात्मक विचार आणि घरातील हुकुमशाही यामुळे मुलीला जन्मच घेऊ देत नाही. *ज्यावेळेस आमच्या गोठ्यात गाई, घरात आई आणि परिवारात ताई यांचा जर मान सन्मान केला जाईल* आणि त्यांना स्वातंत्र्य, समता, एकता व घरात मत ठेवण्याचा अधिकार दिला जाईल तेव्हाच लोकशाहीचे घर, राज्य आणि देश आहे असे आपण म्हणू शकतो. 

नाव: पवन नानासाहेब देव्हडे

ईमेल : pavandevade43@gmail.com

महाविद्यालयाचे नाव:- मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे,अंकुशराव टोपे महाविद्यालय,जालना

वर्ग:- बी. ए. तृतीय वर्ष

पत्ता:-मु. पो. बठाण (बु.) ता.जि.जालना

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *